दक्षिण मुंबईत महाराष्ट्र बंदचा पन्नास टक्के प्रभाव

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबादेवी: कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आजचा महाराष्ट्र बंदचा दक्षिण मुंबईत 50% परिणाम जाणवत आहे. CSMT, मस्जीद बंदर, सैंड्हर्स्ट रोड येथील रेल्वे स्थानकालगत पायधुनी, MRA  मार्ग आणि डोंगरी पोलिसांचा चोख बंदोबस्त सकाळी 6 वाजल्यापासून आहे. आता पर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडली नसून पोलिस कर्तव्यावर आहेत. रेल्वे स्टेशनवर स्पीकरवरुन केंद्रीय सूचना प्रसारण केंद्रावरून लोकल अप आणि डाऊन मार्गावर थांबलेल्या गाड्या सुरळीत होत असल्याची तसेच अफवांवर विश्वास ठेवू नयेत अशा हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषेतून घोषणा करण्यात येत आहेत.

मुंबादेवी: कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आजचा महाराष्ट्र बंदचा दक्षिण मुंबईत 50% परिणाम जाणवत आहे. CSMT, मस्जीद बंदर, सैंड्हर्स्ट रोड येथील रेल्वे स्थानकालगत पायधुनी, MRA  मार्ग आणि डोंगरी पोलिसांचा चोख बंदोबस्त सकाळी 6 वाजल्यापासून आहे. आता पर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडली नसून पोलिस कर्तव्यावर आहेत. रेल्वे स्टेशनवर स्पीकरवरुन केंद्रीय सूचना प्रसारण केंद्रावरून लोकल अप आणि डाऊन मार्गावर थांबलेल्या गाड्या सुरळीत होत असल्याची तसेच अफवांवर विश्वास ठेवू नयेत अशा हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषेतून घोषणा करण्यात येत आहेत. हार्बर रेल्वेची सुरु असून मेन लाईन थोड्या उशिराने धावत आहेत. डोंगरी येथील बौद्ध पंचायत समिती तर्फे दुपारी 3 वाजता मोर्चा काढत डोंगरी पोलिसांना निवेदन देण्यात येणार असल्याचे पंचायत सदस्यांनी सांगितले.
 
जे जे रुग्णालयात नेहमी पेक्षा रुग्ण संख्या रोडावली आहे. नेहमी गजबजलेल्या रुग्णालयात आजच्या महाराष्ट्र बंदमुळे जवळ पास 50 टक्के रुग्ण कमी आल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका बी वार्ड येथे कर्मचाऱ्यांची 55% उपस्थिती दिसून आली. जे जे रुग्णालयात नेहमी पेक्षा 50% कमी पेशंट येत आहेत. 
उपचारा करिता येणाऱ्या पेशंट्सना डॉ. नीलेश लोंढे हे मदत करताना पहावयास मिळाले. सुप्रिंटेंड ऑफिसला भेट दिली असता, अधिक्षक डॉ. संजय सुरासे हे हॉस्पिटल वॉर्ड विजिटला गेल्याचे समजले. कार्यालयातील डयुटीवर असलेले मेडिकल ऑफिसर डॉ. हमजा खान आणि डॉ. आसिम सैय्यद यांची नियमित सेवा सुरळीत चालू असल्याचे पहावयास मिळाले. 

आत्ताच प्राप्त सुचनेनुसार CSMT येथून मेन लाईनची जाणारी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत कल्याणकड़े रवाना होणार नाही. मागील पाऊण तासापासून गाडी आलीच नाही, म्हणून मुंबई विद्यापीठाचा TYBA चा फायनलचा पेपर असलेल्या विद्यार्थीनी कीर्ति कॉलेज येथील सेंटरवर जाण्यास सैंडहर्स्ट रोड स्टेशन वर अडकल्या आहेत.

 

Web Title: Marathi news mumbai news south mumbai 50 percent on strike