डोंबिवलीत दर्जेदार काव्यमय संध्येने मकरोत्सवाची सुरुवात

Makarotsav
Makarotsav

डोंबिवली : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित मकरोत्सव 2018चे पहिले पुष्प 'गाण्यातील कविता' या कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनोख्या कार्यक्रमाने गुंफले गेले. कवी वैभव जोशी यांनी कवी ग्रेस, बालकवी, कुसुमाग्रज, विं. दा करंदीकर, बा.भ बोरकर, मंगेश पाडगांवकर यांसारख्या अनेक दिग्गज कवींच्या प्रसिद्ध तसेच काही फारश्या प्रसिद्ध नसलेल्या पण अत्यंत खोल गर्भितार्थाच्या काही कविता सादर केल्या. तसेच त्यांनी लिहिलेल्या राष्ट्रगीत, आई, गाभारा यांसारख्या अनेक कवितांनी रसिकांची मने जिंकली. 'ओंकार अनादी अनंत' या संत ज्ञानेश्वरांच्या काव्याने ऋषिकेश रानडे यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर मराठी साहित्यातील तु तेव्हा कशी, पराधीन आहे जगती, तिन्ही लोक आनंदाने, स्वर गंगेच्या काठावरती, त्या पैल तीरावर मिळेल मजला या सारख्या अनेक प्रसिद्ध रचना सादर केल्या. तर सुर नवा ध्यास नवा फेम शमिका भिडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात मधु मानसी माझ्या सख्यापरी, भय ईथले संपत नाही, हे श्याम सुंदर यांसारख्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

माझी मा सरोसती, चाफा बोलेना, सरीवर सरी या गाण्यांचे सादरीकरण सारेगमप फेम मानसी जोशी यांनी सादर केले. आभ्यासपूर्ण निवेदनातून दिप्ती भागवत यांनी अनेक कवितांच्या मागची कविची संकल्पना, अनेक कविंच्या कारकिर्दीचा मागोवा घेत रसिकांसमोर अनेक फारश्या प्रसिद्ध न झालेल्या कविता देखील सादर केल्या.
 तबल्यावर आर्चिस लेले, गिटारवर अमोघ दांडेकर आणि पेटीवर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला ते कमलेश भडकमकर अशा निवडक वाद्यवृंदाच्या कल्पक बांधणी मुळे खऱ्या अर्थाने गाण्यातील कविता रसिकांसमोर उलगडण्यात यश आले.
 मकरोत्सवांतर्गत आज बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त त्यांचा सांगितीक प्रवास उलगडणारा देणे नक्षत्रांचे तर उद्या जलसा या कथक फ्लेम्कोचा जुगलबंदिचा आदिती भागवत व कुणाल ओम यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com