स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला सुरवात

संजीत वायंगणकर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

डोंबिवली : आपल्या हिंदुस्थान देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वतः आत्मचिंतन करून आपल्या जीवनात योग्य बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच समाज हळूहळू बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने भक्कम उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल. असे विचार स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना वक्ते 
अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंदानी विजिगिषु भारतचे स्वप्न पाहिले यासाठी समाजाच्या ताकदीची पुनर्स्थापना करणे आवश्यक असून यासाठी समाजाचे संघटन, मनुष्य निर्माण व राष्ट्र उभारणी हे लक्ष ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी भारताची जगातील प्रतिमा ही अंधश्रद्धाळू व दुर्बल अशी होती. यानंतर भारतातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानानी ही प्रतिमा बदलण्यास मदत झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा वैद्य यांनी तर आभार संस्था सदस्य रवींद्र जोशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मृणाल देवस्थळी हिच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.

Web Title: Marathi news mumbai news starts swami vivekanand speech series