राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा स्वामी विवेकानंद पुरस्कार अविनाश धर्माधिकारी यांना प्रदान

dombivali
dombivali

डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्थेने दिलेला स्वामी विवेकानंद पुरस्कार हा माझ्या पुढील कार्यासाठी बळ देणारा असून एक ध्येय ठेऊन राष्ट्र घडविणारे उत्तम कार्यकर्ते अधिकारी व जगातील सर्वोत्तम पातळीपर्यंत पोहचविणारे जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनविण्याच्या ध्येयाला प्रोत्साहन देणारा असा आहे. असे विनम्र प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी एकविसावा स्वामी विवेकानंद पुरस्कार स्विकारल्या नंतर बोलताना केले. यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे देण्यात येणारा स्वामी विवेकानंद पुरस्कार माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना संस्था अध्यक्षा सौ. सुलभा डोंगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुढे बोलताना ते म्हणाले जीवन जगताना म्हणण्याची पहिली प्रार्थना म्हणजेच 'सर्वांचे कल्याण होवो'. प्रार्थना सकारात्मक बदल घडवून कल्याण करु शकते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. हेच स्वामीजींना अभिप्रेत होत.

"वसुधैव कुटुंबकम्" ही भारतीयांची संस्कृती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची वाटचाल ही महासत्तेच्या दिशेने चालू आहे.
 यावेळी धर्माधिकारी यांनी आईने देखील हीच शिकवण दिल्याचे म्हटले तसेच स्वामींचे उदाहरण देताना आपल्याकडे बळ हवे पण त्याचा वापर कुठे व कधी करायचा हे ठरवता आले पाहिजे. आदर्श शिक्षक हा विद्यार्थ्यांवर निरपेक्ष अगदी आईच्या मायेने प्रेम करणारा असावा असे म्हटले. "चाणक्य" ही संस्थाही असेच कार्य करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता विनोद बहाळकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय संस्था सदस्य आर. डी. पाटील, आभार संस्था सदस्या अश्विनी मुजुमदार यांनी मानले. ईशस्तवन दत्तनगर माध्यमिक व स्वागतगीत विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. पाहुण्यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन सुनिल पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शाळेतील विद्यार्थी श्रेयस व्यास याच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com