मोखाड्यात पाच शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

भगवान खैरनार
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चंद्रकांत नांदे (मोखाडा), किशोर पवार (हिरवे पिंपळपाडा), संतोष पाटील (उधळे), मोतीराम झुगरे (डोल्हारा), गुरुनाथ खोरगडे (वाशाळा) या पाच शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर केंद्रनिहाय एक शिक्षकांची प्रयोगशिल व उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करण्यात येऊन त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. मोखाड्यातील साई मंदिराच्या विठ्ठलदादा पाटील सभागृहात हा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ होते. यावेळी वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, पुरस्कारार्थीची निवड करताना पुढील वर्षापासून फायली मागवायच्या नाही तर आपण स्वतःहून शाळांना भेटी देऊन, उत्कृष्ट शिक्षक निवडून त्याची आदर्श शिक्षक म्हणून निवड करायची जेणेकरून या निवडीत पारदर्शकता येईल असे सांगितले आहे. तसेच पुढील वर्षापासून 5 सप्टेंबरला शिक्षक दिनालाच या पुरस्कारांचा कार्यक्रम होईल अशी ग्वाही सभापती प्रदीप वाघ यांनी दिली आहे.

सभापती प्रदीप वाघ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाच आदर्श शिक्षक तसेच प्रयोगशिल शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना, या भागातील अडचणींवर मात करून अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांचे खरच कौतुक करायला हवेच याशिवाय आहे त्या परीस्थितीत येथील भावी पिढी अधिक सक्षम सुशिक्षित बनविण्याची आपण जबाबदारी घ्या आणि या भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जातील असे घडवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी केले आहे.

गत साली प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले नसल्याची खंत, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात काम करताना मी पाहतो की, मोखाडा शिक्षण विभाग आणि शिक्षक बांधवांचा अव्वल क्रमांक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी तहसीलदार पी. जी. कोरडे आणि गटविकास अधिकारी प्रमोद गोडंबे यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करताना संतोष पाटील यांनी विद्यार्थी म्हणजे दिवा असून तो तेवत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू हा पुरस्कार नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील असे सांगितले आहे.

या शिक्षक गुणगौरव कार्यक्रमास मोखाडा नगरपंचायती च्या उपनगराध्यक्षा महानंदा पाटील, उपसभापती संगीता दिघा, जिल्हा परिषद सदस्य सदस्य दिलीप गाटे, पंचायत समिती सदस्य व माजी सभापती सारीका निकम, मधूकर डामसे, शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद कोठेकर तसेच सर्व नगरसेवक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news mumbai news teachers award