ठाण्यात 13 हॉटेल्स सील ठाणे आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या एकूण 86 हॉटेल व बारपैकी 13 हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने रविवारी केली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली. 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या एकूण 86 हॉटेल व बारपैकी 13 हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने रविवारी केली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली. 

अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण 426 हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी सुमारे 80 जणांनी आवश्‍यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित केली होती. तसेच 260 प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर केली आहेत. नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण 86 हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. 

त्यानुसार रविवारी हॉटेल टायटॅनिक (कळवा), हॉटेल एव्हरी डे अंडे (नौपाडा), हॉटेल म्युनो (कोठारी कंपाऊंड), हॉटेल 70 डिग्री (कोठारी कंपाऊंड), हॉटेल रेनबो बार (बाळकुम नाका), हॉटेल एक्‍स झोन (वाघबिळ), हॉटेल गोल्डन फास्ट फूड (कोपरी), हॉटेल लजीज फूड जंक्‍शन (कोपरी), हॉटेल हादिया, हॉटेल कौसर (कौसा- मुंब्रा), हॉटेल देवीदर्शन (रघुनाथनगर), हॉटेल फुकरे (फ्लॉवर व्हॅली) आदी हॉटेल्स सील करण्यात आली. ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे आणि त्यांच्या पथकाने केली. 

Web Title: Marathi News Mumbai News Thane 13 Hotels Had been sealed