पालिका आयुक्तांसाठी ठाणेकरांचा ब्लॅक आऊट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

ठाणे महापालिका आयुक्‍तांवर काहींनी आरोप केले होते. त्या वेळी आयुक्तांनी बदलीसाठी अविश्‍वास ठराव आणावा, असे आवाहन नगरसेवकांना केले होते. आयुक्तांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी होत असल्याने त्याला विरोधासाठी हा ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. 

ठाणे : ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठिंबा देण्यासाठी घोडबंदर रोड आणि पोखरण रोड क्रमांक एक परिसरातील काही सोसायट्यांमध्ये ब्लॅक आऊट पाळण्यात आला. होळीच्या दिवशी एक मिनिटासाठी ब्लॅक आऊट म्हणजेच इमारतीमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.

ठाणे महापालिका आयुक्‍तांवर काहींनी आरोप केले होते. त्या वेळी आयुक्तांनी बदलीसाठी अविश्‍वास ठराव आणावा, असे आवाहन नगरसेवकांना केले होते. आयुक्तांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी होत असल्याने त्याला विरोधासाठी हा ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. 

होळीचा सण उत्साहात सुरू असताना अनेक सोसायट्यांमधील नागरिकांनी आपल्या घरातील वीजपुरवठा एक मिनीट बंद ठेवला. तसेच कॅंडल मार्च काढून आयुक्तांना पाठिंबा दर्शवला. ठाण्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी काही काळ ठाण्यात राहावे, असे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या नागरिकांकडून दिले जाणार आहे. जयस्वाल ठाण्यात उत्तम काम करीत असून, ठाण्याचा विकास खऱ्या अर्थाने त्यांनीच केला आहे, असे मत ठाणेकरांनी व्यक्त केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Mumbai News Thane Electricity Black Out