भिडे म्हणत असतील तरी अॅट्रॉसिटीचा गैरवापर नाही : आठवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची गरज नाही. मी त्या खात्याचा मंत्री आहे. दंगलीचे गुन्हे दाखल केले की अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात, 
कारण दलितांवर हल्ला आहे. संभाजी भिडे जरी म्हणत असतील तरी ही मला वाटतं अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

रामदास आठवले यांनी आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. आठवले म्हणाले, की राजकीय फायद्यासाठी मराठा लोक आपल्याच मराठा समाजाच्या माणसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतात. मी काँग्रेससोबत असताना प्रकाश आंबेडकर भाजपसोबत रहायला इच्छुक होते. मात्र मी आता भाजपसोबत असल्याने त्यांना योग्य वाटत नाही.

तसेच ते म्हणाले, जिग्नेश मेवानीने बोलण्याची पद्धत बदलावी, मी त्याला त्या केसमध्ये मदत करेल. जिग्नेश मेवानीच्या भाषणाचा आणि दंगलीचा संबंध नाही. दलित-मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणीही दोषी असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रकाश आंबेडकर यांनी जरी बंद जाहीर केला असला तरी माझा पक्षही त्यात सहभागी होता. मंत्री असल्याने मला बंदला जाहीर पाठिंबा देता आला नाही. देशातल्या प्रत्येक घटनांवर पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नाही. प्रकाश आंबेडकर मोठे होत असतील, तर त्यांचे स्वागत पण त्यांनी मलाही मोठे करावे मी बँकफूटवर गेलोय असे नाही. रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य होत असेल तर मी तयार आहे. त्यांनी अध्यक्ष व्हावे पण त्यांना ऐक्याची गरज वाटत नसेल तर मी काय करू? असे यावेळी बोलताना आठवले म्हणाले.

Web Title: Marathi news mumbai news there is no any misuse about atrocity said by ramdas athvale