उल्हासनगरात वर्दळीच्या रोडवरील वाहनांच्या चाकांना लागतोय जॅमर

दिनेश गोगी
सोमवार, 15 जानेवारी 2018

उल्हासनगर : वर्दळीच्या रोडवर चारचाकी वाहने उभी करून उल्हासनगरात वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनांच्या चाकांना जॅमर लावण्याची आणि दंडात्मक रक्कम वसूल करण्याची संयुक्त मोहीम पालिका आणि वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. 

या मोहिमेमुळे वाहतूक कोंडीवर मात होणार असून अनेक रोड मोकळा श्वास घेतील असा विश्वास पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

उल्हासनगर शहरातील अनेक वर्दळीच्या रोडवर ट्रान्सपोर्ट, मालवाहतूक, बाजारपेठेत खरेदीसाठी येणारी मंडळी त्यांची चारचाकी उभे करतात. वाहतूक पोलीस केवळ मोटरसायकलवर कारवाई करतात असा समज या मंडळींनी गृहीत धरला होता. यावर तोडगा काढण्यासाठी आणि चारचाकी वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. युवराज भदाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सोनवणे, प्रभाग 2 चे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांची पालिकेत बैठक झाली आणि त्यानुसार प्रथम काजल पेट्रोल पंपासमोरील रोडवर उभ्या केल्या गेलेल्या चारचाकी वाहनांवर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण यांनी जॅमर लावून सुमारे सहा हजार रुपयांची दंडात्मक रकमेची वसूली केली. त्यामुळे प्रथमच या वर्दळीच्या रोडने मोकळा श्वास घेतला आहे. प्रभाग समिती 2 मध्ये असंख्य बाजारपेठा असून तिथे निर्धास्तपणे वाहने उभी केली जातात. टप्याटप्याने येथील सर्व वाहनांवर जॅमरचा वॉच ठेवण्यात येणार असल्याने येत्या काही कालावधीतच बाजारपेठांची वाहतूक कोंडीतून सुटका असे सुखावून सोडणारे चित्र हमखास दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रोडवर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांचा मालक किंबहुना चालक कोण अशी विचारणा केली जाते. कुणी पुढे येत नसल्याचे बघून चाकांना जॅमर लावण्यात येते. त्यामुळे हे वाहन जागचे हलू शकत नाही. या जॅमरवर वाहतूक पोलिसांचा संपर्क नंबर असतो. वाहन चालक आल्यावर तो वाहन सुरू करण्याचा प्रयत्न करतो. पण वाहन जागचे हलू शकत नसल्याने चाकांना जॅमर लावण्यात आल्याची बाब चालकाच्या निदर्शनास येते. जॅमरवर असलेल्या संपर्क नंबरवर तो फोन करतो आणि त्याने दंडात्मक रक्कम भरल्यावर चाकांची जॅमर मधून सुटका केली जाते.

Web Title: Marathi news mumbai news traffic police applies jammer to vehicles at ulhasnagar