घोटाळेबाज आरोप करतात हे लज्जास्पद : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

मुंबई : सिंचन, लॉटरी, आदर्श असे घोटाळे करणारे घोटाळेबाजच आता आमच्यावर ज्या पद्धतीने चिखलफेक करत आहेत ते लज्जास्पद असल्याचे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा अधिकार त्यांचा असल्याचे शनिवारी (ता. 12) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली; मात्र उद्धव ठाकरे यांनी देसाई यांचे समर्थन करत विरोधकांवरच हल्ला चढवला.

मुंबईत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांना ते म्हणाले, 'आरोप कर आणि घे राजीनामा' हा पायंडा महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसा नाही. आम्ही सुभाष देसाई यांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. देसाई यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना थांबवले. यासंदर्भात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे झाले आहे. त्यांची पाप काढू नये म्हणून त्यांनी आक्रमक होण्याचे अवसान आणले. देसाईंवर झालेल्या आरोपांची चौकशी झाल्यावर जनतेसमोर खरे काय ते येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

ज्यांना घोटाळेबाज म्हणून जनतेने घरी पाठवले, त्यांच्या आरोपांची चौकशी करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर ते असेच आरोप करत बसतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी खडसे यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. एकाद्या व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी भ्रष्टाचाराची वाट पाहायची गरज नसते. हा अधिकार मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षांचा आहे, असे सांगत त्यांनी खडसे यांच्या राजीनाम्यामागे भ्रष्टाचाराऐवजी दुसरेच कारण असल्याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.

Web Title: marathi news mumbai news Uddhav Thackray Devendra Fadnavis NCP Congress