आम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई : सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत. कोणतीही भूमिका विचार करून घ्यावी लागते. त्यामुळे योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. जी भूमिका घेईन ती माझ्या स्वार्थासाठी नाही, तर मराठी आणि हिंदूसाठी घेईन, असा इशारा आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. हा इशारा देऊन सत्ता सहज सोडणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

परळ येथील डॉ. शिरोडकर सभागृहात झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्रविक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ठाकरे बोलत होते. 'महापालिका आमच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत. आता म्हणाल नाराज आहात तर सत्तेतून बाहेर का पडत नाही? मी भूमिका घेत असतो; पण माझाही काही विचार असतो. ज्या वेळी भूमिका घ्यायची त्या वेळी ती घेणार. जेव्हा निर्णय घेऊ तेव्हा बेधडक भूमिका मांडू', असा इशारा ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिला. 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत मंगळवारीच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला. सरकारवर टीका करूनही शिवसेना सत्तेत असल्याबद्दल विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष इशारा ठाकरे यांनी दिला.

मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीपासून शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे खिशात असल्याची वल्गनाही केली होती. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news mumbai news Uddhav Thackray Devendra Fadnavis Shiv Sena BJP