विधानसभेत 'हत्ती' आणि 'वाघ'

विजय गायकवाड
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई : उत्तरप्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीतील पडसाद थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पडले आहे. वन्यजीवांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबतच्या लक्षवेधीचे उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र आणि  उत्तरप्रदेशातील हत्ती नियंत्रणासोबत वाघांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतल्याचे सांगत राजकीय कोटी केली.

शुक्रवारी विधानसभेत आ. संध्याताई कुपेकर यांनी सिंधुदुर्गातील हत्ती कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, चंदगड आणि शाहुवाडी  तालुक्यात शेतीचे नुकसान करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. उत्तरात वनमंत्री मुनगंटीवार यांनी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी राज्यसरकार विविध उपाययोजना करत असल्याचे सांगितले. लोकसभा पोट निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख न करता त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर उत्तर प्रदेशातील हत्तींच्या नियंत्रणासाठी मोहीम राबवणार असल्याचे सांगितल्यावर  विधानसभेत हास्यकल्लोळ झाला.

त्यावर आ. दिलीप वळसे पाटील यांनी हत्तींचे नियंत्रण कराल पण राज्यातील वाघांचे काय करणार? असा खोचक सवाल शिवसेनेचा उल्लेख न करता उपस्थित केला. वाघांचे संवर्धन आणि विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितल्यानंतर सभागृहात पुन्हा हास्याचे फवारे उडाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news mumbai news vidhansabha elephant and tiger