भाजपची सत्ता असूनही पाणीवाटप करार रखडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई - केंद्रात तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भाजपची सत्ता असूनही गारगई-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाचा अंतिम पाणीवाटप करार रखडला आहे; मात्र हा करार लवकरात लवकर व्हावा, यासाठी पावले उचलत आहोत, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच दिली.

महाराष्ट्र आणि गुजरातदरम्यानच्या या करारावर स्वाक्षऱ्या होणे बाकी आहे. या दोन्ही राज्यांत, तसेच केंद्रातही भाजपचे राज्य असल्याने हा करार तातडीने व्हायला हवा होता; मात्र तो काही वर्षांपासून रखडला आहे. राज्य सरकारने पिंजाळ प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याच वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या होतील, असा विश्‍वास मेहता यांनी व्यक्त केला. प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मान्यता मिळवण्यासाठी पावले उचलली असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: marathi news mumbai news water distribution agreement bjp