डोंबिवली - महिला दिनाचा सप्ताह उत्साहात साजरा

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

डोंबिवली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सप्ताह सर्वत्र आजही उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून राजकिय, सामाजिक, क्रिडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या तब्बल 25 असामान्य महिलांचा जोंधळे विद्यासमूहाच्या पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजतर्फे गौरव करण्यात आला.

डोंबिवली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सप्ताह सर्वत्र आजही उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून राजकिय, सामाजिक, क्रिडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या तब्बल 25 असामान्य महिलांचा जोंधळे विद्यासमूहाच्या पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजतर्फे गौरव करण्यात आला.

संस्थेच्या संस्थापिका पार्वतीबाई जोंधळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या दिवसाचे औचित्य साधून हिरकणी पुरस्कार वितरण करण्यात आले. ही कल्पना संचालिका वैशाली जोंधळे व आय फोर्स सिक्युरिटी सर्विसच्या संचालिका योगिता कार्ले यांची होती. पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालय व आयफोर्स सिक्यारिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक इंद्रजित कार्ले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी समर्थ समाज संस्थेचे संचालक सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, वैशाली जोंधळे यांच्यासह संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या 25 असामान्य महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ध्यानधारणेचा कार्यक्रम शाळेत यशस्वीरीत्या राबविणाऱ्या श्वेतांबरी जोंधळे, तसेच भारतीय अध्यात्म व ज्योतिषी वास्तुबिंदू, हस्तरेखा बिंदू या संदर्भात ऑस्ट्रोवर्ल्डचे प्रदर्शन भरवणाऱ्या यशस्वी उद्योजिका सिराज जोंधळे यांचा  हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सक्रिय कार्यकर्त्या नूरजहाँ साफिया नियास, जवळपास 29 वर्ष मुंबई हायकोर्टात कार्यरत असलेल्या मानकुंवर देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विमा क्षेत्रातील अर्थनियोजना बाबत कार्य करणाऱ्या राधिका चंद्रन, वास्तूभूषण तसेच ज्योतिविद्यालंकार निलम परब, महिला व मानवी अधिकार याबाबत प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पा कशेळकर, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी शर्वरी भोईर अश्या विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या 25 महिलांना हिरकणी पुरस्कार हिरकणी पुरस्कार, सन्मानचिन्ह व चैतन्यप्रतिक असे तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजचे प्राचार्य वाघमारे, स. है. जोंधळे पॉलिटेक्नीकचे प्राचार्य मगर, मुख्याध्यापिका संजिवनी खुळे, विजयश्री मोकाशी, अरूणा राठोड, प्रतिभा ठाकूरदेसाई, मीना प्रजापती, प्रतिभा शेपाळ यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला डोंबिवलीतील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थीती उल्लेखनीय होती. या प्रसंगी हिरकणी पुरस्कार सन्मानित महिलांची देखील कृतज्ञापर समयोचित भाषणे झाली.

Web Title: Marathi news mumbai news womens day week