वेतनवाढ चांगली; तर निद्रादेवी प्रसन्न!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई - सर्वांनाच शांत झोप आणि तणावमुक्त जीवन हवे असते. वाढती महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळे अनेकांना झोपेसंदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातूनही चांगली जीवनशैली आणि उत्तम वेतनवाढ झाल्यास झोपेसंदर्भात समस्या उद्‌भवत नसल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ‘मॅट्रेस’ कंपनीतर्फे दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथे या संदर्भात नुकतेच हे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणातील निरीक्षणे 
 वेतनवाढ आणि झोपेचा परस्परसंबंध असतो.
 तिशीपर्यंत अधिक वयाच्या लोकांहून चांगली झोप लागते. त्यानंतर समस्या दुपटीने वाढते, तर पंचेचाळिशीनंतर ही समस्या तिप्पट होते.
 बंगळूरमधील लोक सर्वांत लवकर (रात्री १० ते ११ दरम्यान) झोपतात; तर मुंबईकर मध्यरात्रीनंतर झोपतात.
 मुलांसोबत बेडवर झोपणाऱ्या सुमारे ५० टक्के लोकांच्या झोपेविषयी तक्रारी असतात. वेगळ्या खोलीत झोपणाऱ्यांना झोप चांगली लागते.
 धूम्रपानामुळे झोपेवर विपरीत परिणाम होतो. 
 जास्त वजनाच्या लोकांना झोपेसंबंधी अधिक तक्रारी जाणवतात. 
 व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत तिप्पट झोपेच्या समस्या.

झोप ही एक नैसर्गिक क्रिया आहे; मात्र तिला फारसे महत्त्व दिले जात नाही. कार्यालयात जादा काम करण्यासाठी झोपेकडे दुर्लक्ष करतात. दीर्घकालीन उत्पादनक्षमता, कार्यतत्परता, स्मरणशक्ती आणि गंभीर आजारांपासून बचाव व्हावा म्हणून चांगली झोप आवश्‍यक असते.
- डॉ. हिमांशू गर्ग, निद्रातज्ज्ञ, ‘एविझ हेल्थ’चे संस्थापक

Web Title: marathi news mumbai news world sleep day