झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी एका बिझनेसमनवर विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी सरफराज उर्फ अमर खन्ना नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

झीनत अमान यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी सरफराज याने अमान यांच्या बिल्डिंगखाली येऊन त्यांना धमकावले. तसेच सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन करुन त्याला देखील मारहाण केली. आरोपी सरफराज काही दिवसांपासून आपला पाठलाग करत असल्याचेही अमान यांनी पोलिसांना सांगितले. तसेच सरफराज हा व्हॉट्सअॅपवर देखील अश्लील मेसेज पाठवत असल्याचा आरोप झीनत अमान यांनी केला आहे.

पोलिसांनी सरफराजविरोधात 354(ड) (पाठलाग करणे), 509आयटी अॅक्ट (महिलेला धमकी देणे) तसेच इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरफराज सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: marathi news mumbai news zeenat aman molestation case against businessman