रेलरोकोमुळे रस्त्यावरही झाली वाहतूक कोंडी

रविंद्र खरात 
मंगळवार, 20 मार्च 2018

कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक ही कोलमडली होती.

कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक ही कोलमडली होती.

रेल्वे प्रशासन आपले ऐकत नाही, नोकर भर्ती करत नाही, उपासमारीची वेळ आली असून आपल्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य घालावे यासाठी रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात आज सकाळी सात वाजल्यापासून माटुंगा येथे आंदोलनाला सुरवात झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकारला कोणतीही पूर्व कल्पना नव्हती का याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर आरोप केले. सुरवातीला रेल्वे प्रशासनातील एकही अधिकारी या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेला नव्हता. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवरच ठिय्या मांडल्याने वाहतूक होऊ शकली नाही. पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी लाठीमार केला. यात विद्यार्थी जखमी झाले.

कल्याण मध्ये चार ही बाजूने वाहतूक कोंडी ...
मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा, बस, टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाश्यांनी धाव घेतल्याने गर्दी होती स्टेशन परिसर मध्ये वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली याचा फटका कल्याण मुरबाडरोड वरील वालधुनी पुल , कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड पूल, कल्याण जवळील दुर्गाडी जवळील पूल, पत्रीपूल, कल्याण शिळफाटा रोड वरील मानपाडा, काटई परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालका समवेत नागरिकांचे चांगलेच हाल झाले. कल्याण पश्चिममधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने प्रयन्त केला मात्र शहराच्या चारही बाजूला असलेल्या रस्त्यावर वाहनांची रांग लागल्याने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दुपारी पावणेबारा वाजता वाहतूक कोंडी दूर करण्यास वाहतूक पोलिसांना यश आले.

Web Title: marathi news mumbai railway exa m students agitation kalyan traffic