श्रीमंत शहरांत मुंबई जगात बाराव्या स्थानावर

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, मुंबई जगातील श्रीमंत शहरामध्ये 12व्या स्थानावर आहे. मुंबईने श्रीमंत शहरामध्ये पॅरीस आणि टोरंटोसारख्या शहराला मागे टाकत 12वे स्थान पटकावले. या यादीत न्यूयार्क शहर प्रथम स्थानावर असून, येथील लोकांकडे तीन ट्रिलियन डॉलरची संपत्ती असल्याचे अहवालात म्हटले आहे. 2.7ट्रिलियन डॉलरच्या संपत्तीसह लंडन दुसर्‍या, तर सॅनफ्रान्सिसको तिसर्‍या स्थानावर आहे. बीजिंग, शांघाय, सिडनी या शहरांचादेखील या यादीत समावेश आहे. 

न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, मुंबईची एकूण संपत्ती 950अब्ज डॉलरची असून, येथे 28अब्जाधीश राहतात.  ही पाहणी करताना त्या-त्या शहरातील लोकांकडे असलेल्या खासगी संपत्तीचा उपयोग करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामध्ये मालमत्ता, रोख, शेअर्स, व्यवसाय आदींचा समावेश करण्यात आला आहे. सरकारी निधी मात्र यातून वगळण्यात आला आहे.

Web Title: marathi news Mumbai richest city New World Wealth Report