'आरे'वर रोहित शर्माची बॅटिंग; हिटमॅन हिट-विकेट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

मुंबई : मुंबईतील आरे वृक्षतोडीवर देशभरात आंदोलन सुरु असताना भारतीय संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर रोहित शर्माने आरे वृक्षतोडीवर भाष्य केलंय. ट्विटरवरून मुंबईतील आरेतील वृक्षतोडीवर रोहित शर्माने टीका केलीये.

रोहित शर्माने मुंबईतील आरे वृक्षतोडीला विरोध दर्शवत ट्विट जरी केलं असलं तरीही नेटीझन्सना मात्र ते रुचलेलं नाही, नेटीझन्सनी रोहित शर्माला चांगलंच ट्रोल केलंय.  

रोहित शर्माने ट्विटरमध्ये म्हटलंय, मुंबईतील हिरवळ आणि तापमान याचं कारण हे आरेतील वृक्ष आहेत, आपण याला कसंकाय कापू शकतो ? या वृक्षतोडीने किती प्राण्यांना आपलं आयुष्य मुकावं लागेल याचा कुठेच उल्लेखही नाही. यावर उत्तर देताना एकाने म्हटलंय '10-20 झाडं तुझ्या बॅट बनवण्यासाठी तोडण्यात आलेत त्याचं काय ? असा प्रतिसवाल रोहितला विचारलाय..  

रोहित शर्माच्या ट्विटरवर आलेल्या काही प्रतिक्रिया :

Image may contain: one or more people

Image may contain: text

Image may contain: 1 person, smiling, text

Image may contain: text

WebTitle : marathi news mumbai rohit sharma tweets on aarey and eventually trolled by netizens  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai rohit sharma tweets on aarey and eventually trolled by netizens