बंद झालेली शाळा झाली पुन्हा सुरु 

मुरलीधर दळवी 
रविवार, 21 जानेवारी 2018

मुरबाड (ठाणे) - मुरबाड तालुक्याच्या सह्याद्री पर्वत रांगेजवळ असलेल्या कोळोशी व कोळोशी वाडी येथील प्राथमिक शाळा पट संख्या कमी असल्याने शासनाने बंद केली होती. परंतु पर्यायी शाळा 2 किलोमीटर लांब असल्याने लहान मुले तेथे जायला तयार नव्हती. कोळोशी व कोळोशी वाडी येथील दोन्ही शाळांचे विद्यार्थी एका शाळेत आणल्यास पटसंख्या पूर्ण होत असल्याने कोळोशी येथे शाळा सुरु करावी, अशी ग्रामस्थांची मागणी शासन मान्य करत नसल्याने ग्रामस्थांनी शेवटी बंद असलेल्या शाळेच्या व्हरांड्यात शाळा भरवली.

गावातील एक तरुण तेथे मुलांना शिकवत होता. पण प्रशासन मात्र ढिम्म होते. शेवटी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत यांनी प्रशासनाला जाब विचारला. तेव्हा कोळोशी येथील शाळा पुन्हा सुरु झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तेथील विद्यार्थ्यांना पाडाळे किंवा दुधनोली शाळेत जायला सांगितले गेले. परंतु त्या शाळेत जायला लहान मुलांना दोन किलोमीटर अंतरावर जाणे कठीण असल्याने कोळोशी व कोळोशीवाडी या दोन शाळांतील मुले एकत्र करुन ती शाळा सुरु ठेवावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठवता शाळेच्या व्हरांड्यातच मुलांना शिकवणे सुरु केले. आठ दिवस गावातील सुशिक्षित तरुण संभाजी देशमुख मुलांना शिकवत होते. परंतु प्रशासन ढिम्म होते. अखेर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकल्या व कोणताही लेखी आदेश न देता व शाळा समितीला विश्वासात न घेता शाळा बंद का केली? असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला. त्यांनी व ग्रामस्थांनी दबाव निर्माण केल्यानंतर प्रशासनाने तेथे पुन्हा शाळा सुरु केली आहे.
   
Web Title: marathi news mumbai the school opened