शिक्षकांचे शुक्रवारी कॉलेज बंद आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे 2 फेब्रुवारीला "कनिष्ठ महाविद्यालये बंद' आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आणि मुंबईतील आझाद मैदानात "जेलभरो' आंदोलन करण्यात येईल. 

या आंदोलनानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी, 2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्यावे, सर्व शिक्षकांना 24 वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी द्यावी, 2003 ते 2011 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्यावे आणि सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशा कनिष्ठ महाविद्यालयीन संघाच्या प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: marathi news mumbai Teachers closed the protest movement on Friday