विद्यापीठांच्या लवादांसाठी कोणत्या सुविधा दिल्या? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - राज्यभरातील विद्यापीठांच्या लवादांसाठी राज्य सरकारने कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. 

मुंबई - राज्यभरातील विद्यापीठांच्या लवादांसाठी राज्य सरकारने कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. 

विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि अन्य तक्रारींबाबत प्रथम विद्यापीठांच्या लवादांमध्ये सुनावणी होते. या लवादांचे अध्यक्ष उच्च न्यायालयांचे निवृत्त न्यायमूर्ती असतात; मात्र अनेक लवादांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधाच राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या नाहीत, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका ऍड. प्रवर्तक पाठक यांनी केली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई विद्यापीठाच्या लवाद अध्यक्षांसाठी निवासस्थान, गाडीची सुविधा असून, कार्यालयातही पुरेशी सुविधा उपलब्ध केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अन्य विद्यापीठांनी त्यांच्या लवादांसाठी काय सुविधा केल्या, अशी विचारणा न्यायालयाने केली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार विद्यापीठांनी यासंबंधी कार्यवाही करणे बंधनकारक आहे; मात्र लवाद आणि अध्यक्षांचा कार्यकाळ निश्‍चित करण्याचा अधिकार सरकारला आहे. राज्य सरकारनेही या सुविधांबाबत विद्यापीठांमध्ये पुरेशी स्पष्टता येण्यासाठी कार्यवाही करावी आणि त्याची माहिती दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे. 

Web Title: marathi news mumbai university court