विक्रोळीतील वृक्षं सोशल मीडियावर व्हायरल; सेल्फी काढण्यासाठी गर्दी

अक्षय गायकवाड
गुरुवार, 8 मार्च 2018

विक्रोळी येथून घाटकोपरकडे जाणारा पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड वर पिंक ट्यूबेबिआ या जातीचे वृक्ष आहेत. त्यांना मोहोर आल्यामुळे या परिसरात आल्यानंतर परदेशी भास होत आहे.

विक्रोळी : आपण जणू काही परदेशात आहोत, असा अनुभव देणाऱ्या वृक्षांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी पूर्व दुर्गती मार्गावर झुंबड उडाली आहे. वसंत ऋतूत या वृक्षांची पाने गळून गुलाबी फुल बहरतात. यामुळे पिंक सिटीसारखे रुप आले आहे.

विक्रोळी येथून घाटकोपरकडे जाणारा पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड वर पिंक ट्यूबेबिआ या जातीचे वृक्ष आहेत. त्यांना मोहोर आल्यामुळे या परिसरात आल्यानंतर परदेशी भास होत आहे. या जातीचे अंदाजे 100  झाडे येथे आहेत. सगळीकडे गुलाबी फुलांचे सोंदर्य पसरले आहे. ही झाडे विदेशी असल्याने येणाऱ्यांना या झाडाबाबत माहिती नाही. त्यामुळे गुलाबी फुलाचे झाड असे संबोधले जात आहे. 

tree

ही झाडे कुठे आढळतात 
ही झाडे अमेरिका, मेक्सिको, अर्जेंटिना, क्यूबा येथे आढळतात. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या झाडांचा मोहोर बहरतो. झाडांची पाने गळून फक्त फुल फुलतात. या फुलांना सुगंध नसतो. फुले दिसण्यास सुंदर असतात.  सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे ही झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे लवकर वाढतात तसेच या झाडांना जास्त पाण्याची गरज भासत नाही. 

सोशल मीडियावर चर्चा 
सोशल मीडियावर या सूंदर झाडांमुळे विक्रोळीचा सर्व्हिस रोड हा चर्चेत आला आहे. काही नेटिझिन्सने याला पिंक सिटी असे नाव दिले आहे. फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून या झाडांचे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. सुरुवातीला हे फोटो फेक असून ते बाहेरील देशातील आहेत. असा आरोप सोशल मीडियातुन करण्यात आला. पण सत्य समजताच विक्रोळीतील या सर्व्हिस रोडचा सगळीकडे बोलबाला होऊ लागला. या झाडासोबत सेल्फी तसेच फोटो शूट करण्यासाठी तरुणाई गर्दी करू लागली आहे. काही तर आमची विक्रोळीत कसे सौदर्य फुलते असे स्टेटस ठेवले आहेत. 

ग्रीन अंब्रेलाचे अध्यक्ष विक्रम यंदे यांनी मत व्यक्त केले, 'सध्या विक्रोळीत बहरलेला गुलाबी ट्यूबेबिआ हा दिसायला सुंदर असला तरी मुळचा भारतीय नसून दक्षिण अमेरिकेच्या उष्ण कटिबंधामधे मुळ वसतीस्थान असलेला पानझडी वृक्ष आहे. सध्या आपल्याकडे सौंदर्यासाठी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लावला जात आहे. विदेशी झाड काही प्रमाणात ठीक आहे. वृक्षारोपणात स्थानिक देशी झाडांना प्राधान्य असायला हवे. सौंदर्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर सध्या बहारात असलेले पळस, पांगारा, बहावा, काटेसावर, कुसुम, नागकेशर, अंजनी, सुरंगी असे अनेक देशी वृक्ष आहेत. देशी वृक्ष स्थानिक जैवविविधता वाढवतात. कीटक, पशु-पक्षी यांना अन्न पुरवठा करतात.'

तर स्थानिक नागरिक गणेश शेट्टी म्हणाले, 'या झाडांमुळे विक्रोळीच नाव चर्चेत आल आहे. मला अनेक लोकांचे फोन आले सोशल मीडियावर येणारे फोटो खरे आहे मी पहिला बोलो नाही पण जेव्हा स्वता जाऊन बघितले तेव्हा डोळ्यावर विश्वासच बसला नाही. सौंदर्य पूर्ण झाडे वाटत होती. या झाडाच्या सानिध्यातच रहावे, असे वाटत होते.' येथे सेल्फी काढायला आलेला कार्तिक साळवे म्हणाला, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या झाडाचा फोटोमधल्या जागी जाऊन फोटो काढावा असे वाटत होते. इथे येऊन मी परदेशी आलो आहे असे वाटू लागले. आता या झाडासोबतचे फोटो मी सोशल मीडियावर टाकणार. 

tree

 

Web Title: marathi news mumbai vikroli trees nature beautiful photos selfies