नवी मुंबई विमानतळाचे काम दोन टप्प्यांत - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यांत होणार असून, पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण होईल. त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत व एक रनवे यांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले. 

सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पामधील 98 टक्के प्रकल्पग्रस्तांनी संमतीने पुनर्वसन स्वीकारले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50 लाख प्रवासी क्षमता असलेली टर्मिनल इमारत आणि एक रनवे यांचा समावेश आहे. डिसेंबर 2019 अखेर पहिला टप्पा पूर्ण होणार असून, त्यानंतर दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण होईल. 

या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील यांनी भाग घेतला.

Web Title: marathi news navi mumbai airport devendra fadnavis