नवी मुंबईत खाजखुजलीच्या अळ्यांची दहशत..   

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

  • सिवूडस  रेल्वेस्थानका जवळील रस्त्यावर अळ्यांचा हल्ला
  • रस्त्यावर जाणाऱ्यांच्या अंगावर अळ्या पडून खाज
     

नवी मुंबई : मुंबईत कधी काय होईल याचा काही नेम नाही. आता नवी मुंबईचे नागरिक धास्तावले आहेत ते म्हणजे अळ्यांमुळे. बरं या अळ्या साध्यासुध्या नाहीयेत. या आहेत  खाजखुजलीच्या अळ्या. नवी मुंबईतील सिवूडस परिसरात या अळ्यांची दहशत पाहायला मिळतेय. 

सिवूडस पश्चिमेला स्टेशनच्या अगदी बाहेर खाडीलगतच्या सर्वच भागावर ह्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  HyblaeaCater (सुरवंट) ह्या प्रकारच्या या अळ्या असून अधिकतर मँग्रोजवर या अळ्या आढळून येतात. 

स्टेशन परिसरातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या अंगावर या अळ्या पडत आहेत. अळी अंगावर पडली किंवा शरीरासोबत  तिचा संपर्क आला की खाज सुटून अंगावर लाल चट्टे येतात. दरम्यान या अळ्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करतायत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navi mumbai citizens facing problem of

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: