राष्ट्रवादीचे वाशीत  मूक आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

बेलापूर - देशात आणि राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ झाल्याने गुरुवारी (ता. ८) जागतिक महिला दिनी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी वाशीतील शिवाजी चौकात मूक आंदोलन केले. या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकार आल्यापासून महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप महिला जिल्हाध्यक्षा सुतार यांनी केला. अल्पवयीन मुली आणि महिला यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा नराधम प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. जागतिक महिला दिन हा महिलांसाठी भूषणावह असून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. महिला दिनाच्या दिवशी आम्हाला निषेध व्यक्त करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सुरक्षेच्या प्रश्‍नावरून महिलांवर आंदोलन करण्याची वेळ आली हे दुर्दैव आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी सांगितले. महिलांना सुरक्षेसाठी मूक आंदोलन करून निषेध मोर्चा काढावा लागतो, ही खेदाची बाब असल्याचे राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी सांगितले. महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनवणे, नवी मुंबई सेवादलाचे अध्यक्ष दिनेश पारख, महिला सेवादल अध्यक्षा आशा शेगदार, बेलापूर विधानसभेच्या महिला अध्यक्षा स्नेहा पालकर, नगरसेविका भारती पाटील, संगीता बोऱ्हाडे, शिल्पा कांबळी, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, तालुका अध्यक्षा शैला पाटील, रुचिता करपे, लक्ष्मी पाटील, विजया कदम आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: marathi news NCP rally belapur women