पालघर जिल्ह्यात सुमारे 98 परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला सुरूवात 

प्रमोद पाटील 
गुरुवार, 1 मार्च 2018

सफाळे (सफाळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारया इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 1 मार्च पासून सुरु झाली. या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून सुमारे  58,268 विद्यार्थी बसले आहेत. 

सफाळे (सफाळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारया इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 1 मार्च पासून सुरु झाली. या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून सुमारे  58,268 विद्यार्थी बसले आहेत. 

आज मराठी विषयाचा पहिलाच पेपर असल्याने सकाळी  नऊ-साडे नऊ वाजल्या पासूनच पालक विद्यार्थ्यांना घेऊन परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक शोधत होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सुद्धा एकमेकांकडून शुभेच्छा देत होते. काही विद्यार्थी थोडे दडपणाखाली दिसत होते. पालघर जिल्हयात दहावीसाठी 98 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली. जिल्हयातील सर्वाधिक केंद्र वसई तालुक्यात असून या तालुक्यात इयत्ता दहावीची 48 केंद्र असून 29,672 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सर्वात कमी विद्यार्थी जव्हार तालुक्यात आहेत.जव्हार तालुक्यात सर्वात कमी दहावीला 2227 विद्यार्थी बसलेले आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. 

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र जवळ पास असावेत म्हणून पालघर जिल्हयात दहावीची बारा नवीन केंद्र या वर्षांपासून सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी. तसेच काही अडचणी उदभवल्यास मंडळाच्या हेलपलाईनवर मदतीला समुपदेशक उपलब्ध असतील असे पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.  

मोखाडा तालुक्यात हिरवे, करेगाव, विनवल ही तीन परीक्षा केंद्रे तर जव्हार तालुक्यात दाभोसा,पालघर तालुक्यात आगरवाडी आणि वसई तालुक्यात नालासोपारा येथील ज्ञानोदय परीक्षा केंद्रे ही संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आली असून या केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. जिल्हयात दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

पालघर जिल्ह्यातील तालुक्यानुसार बसलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे-

तालुका                  इयत्ता दहावी 

वाडा                           3480

मोखाडा                     1572

विक्रमगड                    2725

जव्हार                        2227

तलासरी                     4455

डहाणू                        5685

पालघर                        8452

वसई                          29672

___________

एकूण                       58,268
 

Web Title: Marathi news palghar news 98 centers of 10th board exam