'लोकप्रतिनिधी न मिळाल्याने जव्हारचा विकास रखडला'

अच्युत पाटील
रविवार, 7 जानेवारी 2018

अनेक शिक्षित तरुण तरुणी या व्यवसायात नशीब अजमवण्यासाठी तयार आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन अभावी तरुण पिढी भरकटली जात असल्याची खंत, प्रकाश निकम यांनी व्यक्त केली.

बोर्डी : बालमृत्यू, कुपोषण आणि मागील वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याने भयग्रस्त असलेल्या जव्हार वासियांना स्थानिक लोकप्रतिनिधी न मिळाल्याने जव्हारचा विकास रखडला आहे अशी खंत पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते व मोखाडा मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी व्यक्त केली.

मागील वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. घरांना भेगा पडल्या आहेत. लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यातच जव्हार ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाला वरदान ठरणाऱ्या बहात्तर कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या`खडखड` धरणाला गळती लागली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. चार वर्षापूर्वी सात ते आठ कोटी रुपये खर्च करून ही गळती थांबली नाही. याकामात मोठा गैरव्यवहार झाला आहे. असा आरोप करून निकम म्हणाले, धरणाची व कलव्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती झाल्यास सुमारे चार पाचशे कुटुंब रब्बी हंगामात शेती करून उदरनिर्वाह करतील आणि स्थलांतर थांबवता येईल. तसेच जव्हार तालुक्यात प्रेक्षणीय स्थळ आहेत. मात्र पाणी टंचाई मुळे शहराच्या विकासाला खिळ बसली आहे. शुद्ध व मुबलक पाणी शहरात व ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यास पर्यटन व्यवसाय विकसित करता.

अनेक शिक्षित तरुण तरुणी या व्यवसायात नशीब अजमवण्यासाठी तयार आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन अभावी तरुण पिढी भरकटली जात असल्याची खंत, प्रकाश निकम यांनी व्यक्त केली.

Web Title: Marathi news Palghar news development in jawahar