पनवेलमध्ये पारा ३९ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नवीन पनवेल - मार्चच्या सुरुवातीपासूनच पनवेलकरांना घाम फुटायला सुरुवात झाली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानातील वाढ होत आहे. होलिकोत्सवानंतर शहरात तापमानाचा पारा वर चढायला सुरुवात झाली आहे. सकाळी ११ पासून ते सायंकाळी ५ पर्यंत रणरणते ऊन नागरिकांना घामाघूम करत आहे.

पनवेलच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. १९ अंशांवरील तापमानात हळूहळू वाढ होत आहे. ही वाढ २४ अंशांवर पोहोचली आहे. कमाल तापमानातही याच गतीने वाढ होताना दिसते आहे. साधारण पाच ते सहा अंशांनी कमाल तापमान वाढले आहे. एप्रिल-मे आधीच उन्हाच्या काहिलीने टोक गाठायला सुरुवात केली आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला असून, शहराचे तापमान ३९ अंशांवर गेले आहे. ठिकठिकाणी थंडपेय, लिंबूपाणी, उसाचा रस, ताक खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

Web Title: marathi news panvel temperature summer