पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

तुर्भे - घणसोली सेक्‍टर- ७ येथील डी- मार्टमधील पार्किंगमध्ये सामान ठेवले जात असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी असते. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी महेश शिरोडकर या नागरिकाने केली आहे.

घणसोलीतील डी-मार्टजवळ बस थांबा आणि रिक्षाचा स्टॅंड आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. डी-मार्टमध्ये पार्किंगसाठी तळमजला राखीव असताना तेथे व्यवस्थापनाने साहित्य भांडार सुरू केल्याने ग्राहक रस्त्याच्या कडेला व पदपथावर वाहने उभी करतात. याबाबत अतिक्रमण विरोधी विभागाचे अभियंता रोहित ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई करतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news parking traffic mumbai turbhe