पीएनबी गैरव्यवहार मुंबईत पाच ठिकाणी ईडीची शोधमोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील पाच ठिकाणी शोधमोहीम राबवली. मेहुल चोक्‍सी व कंपन्यांवर दाखल गुन्ह्यासंदर्भात ही शोधमोहीम राबवण्यात आली. 

याबाबत ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी, वडाळा, नेपियन्सी रोड आदी पाच ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. याप्रकरणी झालेल्या कथित मनी लॉण्डरिंगबाबत ईडी तपास करत आहे. 

मेसर्स डायमंड्‌स आरयूएस, मेसर्स सोलार एक्‍सपोर्ट, मेसर्स स्टेलर डायमंड्‌स या कंपन्यांनी परदेशातील देणी चुकती करण्यासाठी जानेवारीमध्ये "पीएनबी'ला "बायर्स क्रेडिट'साठी विनंती केली. आयातदारांच्या बॅंकांनी दिलेल्या "लेटर ऑफ कम्फर्ट'च्या आधारावर आयातदारांना अर्थपुरवठा केला जातो. या गैरव्यवहारात "पीएनबी'च्या दोन अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आठ हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) इश्‍यू केली. अलाहाबाद बॅंकेच्या हॉंगकॉंगमधील शाखेसाठी पाच हमीपत्रे आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या हॉंगकॉंग शाखेसाठी तीन हमीपत्रे जारी करण्यात आली. नीरव मोदी, निशाल मोदी, ऍमी मोदी आणि मेहुल चोक्‍सी हे या कंपन्यांचे भागीदार आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला होता. 

Web Title: marathi news PNB fraud ED mumbai