पोलिस अधिकाऱ्याचा वाहन अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा (२) मध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा वाहन अपघातात मृत्यू झाला. शत्रुघ्न दिनकर राणे (वय ४५) असे त्याचे नाव आहे. अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून त्या चालकाचा शोध घेण्यात येत आहे. ते सध्या विशेष शाखा (२) येथे कर्तव्यास होते. रविवारी रात्री उशिरा ते मित्राला भेटून घरी परतत होते. बोरिवली-पूर्वच्या मागठाणे उड्डाण पुलावरून ते मोटारसायकलने कांदिवलीच्या दिशेला जात होते. तेव्हा भरधाव अज्ञात वाहनाने राणे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. वाहनाच्या धडकेमुळे त्यांच्या पायाला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले.

Web Title: marathi news police officer accident