उल्हासनगरातील पालिकेच्या 28 शाळेत आठवीचे वर्ग सुरू होण्याचे संकेत

दिनेश गोगी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

उल्हासनगर : उल्हासनगरात पालिकेच्या 28 शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या घरातील गरिबीची पाश्वभूमी पाहता या शाळेत इयत्ता 8 वीचे वर्ग सुरू करण्याच्या मनवीसेच्या मागणीला शिक्षण संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिका आयुक्तांनी देखील तसा प्रस्ताव पाठवल्याने येत्या काळात पालिकेच्या सर्व शाळेमध्ये 8 वीच्या वर्गाची गजबज सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगरात पालिकेच्या 28 शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या घरातील गरिबीची पाश्वभूमी पाहता या शाळेत इयत्ता 8 वीचे वर्ग सुरू करण्याच्या मनवीसेच्या मागणीला शिक्षण संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिका आयुक्तांनी देखील तसा प्रस्ताव पाठवल्याने येत्या काळात पालिकेच्या सर्व शाळेमध्ये 8 वीच्या वर्गाची गजबज सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

महानगरपालिका शिक्षण विभाच्या एकूण 28 शाळा असून या शाळांन मध्ये शहरातील गोरगरिब विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असतात. या शाळांमधील जवळपास सर्व विद्यार्थ्यांचे पालक मोल मजुरी करुन आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थिती मुळे आपल्या मुलाला खाजगी शाळेत शिक्षणासाठी पाठवण परवडत नाही. त्यामुळे ते आपल्या मुलाला महापालिकेच्या शाळेत पाठवतात. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य मोफत मिळत तसेच कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी भारावी लागत नाही. परंतु उल्हासनगर महापालिकेच्या शाळेत वर्षानुवर्षे 7 वी पर्यंतच शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागते. म्हणून शहरातील गोरगरिब विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेतच दहावीपर्यंत शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष मनोज शेलार हे गेल्या चार वर्षापासून सतत पाठपुरावा करीत होते. 

अखेर या पाठपुराव्याला यश आले व उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनिल चौहाण यांना आठवीचा वर्ग सुरु करण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजूरी मिळावी व येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या शाळेत शहरातील गोरगरिब विद्यार्थ्यांना साठी 8 वीचा वर्ग सुरु करावा यासाठी मनवीसेचे बंडू देशमुख, मनोज शेलार, शैलेश शिर्के, धनंजय गुरव यांनी शिक्षण संचालकांची पुण्याला जाऊन भेट घेतली. शिक्षण संचालक सुनिल चौहाण यांनी लवकरात लवकर या प्रस्तावाला मंजूरी देण्यात येईल असे आश्वासन मनविसेच्या शिष्यमंडळाला दिले. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहाणार नाही. अशा वल्गना करायच्या दरवर्षी वारंवार सर्वेक्षण करायच आणि  दुसरी कडे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पुरेस शिक्षण उपलब्ध करुन द्यायच नाही. ही दुहेरी भुमिका शासनाची असल्याची खंत बंडू देशमुख यांनी शिक्षण संचालकांकडे व्यक्त केली. यावेळी मनोज शेलार यांनी गेली तीन वर्षे उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाला पूर्ण वेळ शिक्षण अधिकारी नसल्याने शहरातील खाजगी शाळांची मुजोरी वाढली असून महापालिका शिक्षण विभागही बेवारस झाला असल्याबाबत लक्ष वेधले.

 

Web Title: Marathi news pune news ulhasnagar corporation schools starts