शरद पवारांचा आज रायगडमध्ये दौरा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

अलिबाग : जिल्ह्यात मरगळ आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षकार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार सोमवारी (ता. 23) येणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल यांचा अमृतमहोत्सव आणि आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी समारंभ होणार आहे. त्यानिमित्त शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांवर असणारे कार्यकर्ते इतर पक्षांत प्रवेश करत असल्याचे वृत्त आहे. ही गळती रोखली जावी, पक्षसंघटना मजबूत व्हावी, अशी मागणी स्थानिक नेतृत्वाकडून होत आहे. आगामी निवडणुकांसंदर्भात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या पार्श्‍वभूमीवर सूचना केल्या जाऊ शकतात. या वेळी शरद पवार रोहा पर्यटन महोत्सवालाही भेट देणार आहेत, या दौऱ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कामातील अडचणींबाबत चर्चा करतील. वसंत ओसवाल यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुधागड शैक्षणिक संस्थेच्या टॉपवर्थ इंग्लिश स्कूलच्या मैदानात दुपारी 1 वाजता होणार आहे. सुरेश लाड यांचा एकसष्टी समारंभ दहिवली मार्केट यार्ड येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे. 

Web Title: marathi news raigad news sharad pawar