लोककलांना बळ मिळण्याची गरज

मुरलीधर दळवी 
मंगळवार, 20 मार्च 2018

मुरबाड (ठाणे) - महाराष्ट्रात लोककलांना राजाश्रय व लोकाश्रय मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने महाराष्ट्रत घडणारे कलाकार संपले त्याचा परिणाम समाज जीवनावर झाला आहे अशी खंत साहित्यिक रामचंद्र देखणे यांनी मुरबाड येथे व्यक्त केली. महाराष्ट्राची लोककला व लोकसंवाद या विषयावर व्याख्यान देताना ते सोमवारी बोलत होते,

मुरबाड येथील कला गौरव संस्थे तर्फे व्याख्यान माला आयोजित करण्यात आली आहे त्यातील हे दुसरे व्याख्यान होते. लोकांचे प्रबोधन व मनोरंजन करण्याचे काम वासुदेव, पिंगळा, पोवाडा, भारूड, गोंधळ, लावणी अशा अनेक लोककलांच्या माध्यमातून झाले. परंतु, आता सामाजिक जीवन सुद्धा खालावले आहे असेही त्यांनी सांगितले. लोककलांच्या माध्यमातून गावागावातील समाज घडला परंतु, आता लोकाश्रय व राजाश्रय हे दोन्ही मदतीचे मार्ग बंद झाल्याने कलाकारांनी या कलेच्या जपणुकीकडे पाठ फिरवली असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोटीराम पवार, भाजपचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, मुरबाड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी उपस्थित होते. मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष गणपत विशे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्राध्यापक गीता विशे यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: marathi news ramchandra dekhne folk art