‘रिलायन्स वन’ने विजेतेपद पटकावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

बेलापूर -  नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलातील टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यात गुरुवारी (ता. १) रिलायन्स वनने बीपीसीएलवर २५ धावांनी मात करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. रिलायन्सने प्रथम फलंदाजी करताना बीपीसीएलसमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना बीपीसीएलचा संघ अवघ्या १६० धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे रिलायन्सचा २५ धावांनी विजय झाला.

डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात १४ वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील टी-२० क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या वेळी या सामन्यामध्ये डी. वाय. पाटील ए, डी. वाय. पाटील बी, सेंट्रल रेल्वे, आरबीआय, इंडियन ऑईल, मुंबई पोलिस, ओएनजीसी, एयर इंडिया, वेस्टर्न रेल्वे, टाटा स्पोर्टस क्‍लब, कॅग, कॅनरा बॅंक, रिलायन्स वन, कॉलेज ग्रुप, बीपीसीएल, जैन इरिगेशन अशा १६ संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ३१ साखळी सामने झाले. यामधील रिलायन्स वन विरुद्ध डी. वाय. पाटील बी आणि बीपीसीएल विरुद्ध कॅग अशा चार संघांमध्ये सेमीफायनलची लढत झाली. त्यामध्ये रिलायन्स वन आणि बीपीसीएल संघ विजयी झाले होते. त्यामुळे या दोन संघांमध्ये अंतिम लढत झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या रिलायन्स वनचा कर्णधार सौरभ तिवारीने फटकेबाजी करीत ६३ चेंडूंत ११२ धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी बीपीसीएलसमोर १८५ धावांचे आव्हान होते. २० षटकांच्या या सामन्यात बीपीसीएलने नऊ बाद १६० धावा केल्या. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. रिलायन्स वनने गेल्यावर्षीही ७४ धावांनी विजेतेपद पटकावले होते.

Web Title: marathi news reliance T-20 cricket mumbai