म्हसोबाच्या यात्रेत भाविकांची गर्दी

मुरलीधर दळवी
सोमवार, 8 जानेवारी 2018

मुरबाड (जि. ठाणे) - महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसोबाच्या यात्रेत रविवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने तुडुंब गर्दी झाली. मंगळवार ता. 2 पासून धिम्या गतीने सुरू असलेल्या म्हसोबाच्या यात्रेला रविवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने म्हसा यात्रा माणसांच्या गर्दीने फुलून गेली होती. या गर्दीचा फायदा उठवत बाजारात विविध वस्तूंचे भाव वाढले मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे म्हसा परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

रविवारी सकाळ पासूनच ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने म्हसा गावी येऊ लागले होते. रविवार हा मांसाहाराचा दिवस असल्याने यात्रेकरु सहकुटुंब आले होते. यात्रेत वाढलेली गर्दी बघून व्यापाऱ्यांनी आपल्या मालाचे भाव वाढवून ठेवले होते. घोगडी बाजारात घोगडीचा दर चौदाशे रुपयापर्यंत गेला होता. घासा घीस केल्यावर हीच घोंगडी सातशे रुपये ते नऊशे रुपयापर्यंत विकली जात होती. पाच दिवस ओस पडलेल्या मिठाई बाजार व टोपली बाजार परिसरात गर्दीच गर्दी झाली होती. मागच्या वर्षी दिड ते दोन हजार रुपयात विकल्या गेलेल्या उखळीचा भाव 3 ते 4 हजार रुपयापर्यंत पोहचला. मंदिरात दर्शनासाठी झालेली गर्दी नंतर चिकन मटण मच्छी बाजाराकडे वळत असल्याने तेथेही गर्दी होती.
         
यात्रेकरुंनी म्हसा यात्रेसाठी जाणाऱ्या बस गाड्यांना चांगला प्रतिसाद दिला त्या मुळे मुरबाड आगारातून दर दहा पंधरा मिनिटाने बस म्हसा गावाकडे रवाना होत होत्या. वाहनांच्या गर्दी मुळे कान्होळ ते म्हसा व म्हसा ते बाटलीची वाडी तसेच मुरबाड बस स्थानका जवळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शहरातील लोकांना सुध्दा म्हसा यात्रेचे आकर्षण असल्याने शहरी माणसेही आज यात्रेत दिसत होती.

Web Title: marathi news religious news yatra