रिक्षा संघटनांची ऑनलाईन ई सेवा कौतुकास पात्र - संजय ससाणे 

marathi news rikshaw driver e service sanjay sasane
marathi news rikshaw driver e service sanjay sasane

कल्याण - 'सर्व शासकीय यंत्रणा ऑनलाईन होत असताना रिक्षाचालकांनी का मागे राहावे? प्रतिदिन काही ना काही काम आरटीओ कार्यालयात असते, गर्दीही असते त्यामुळे व्यावसायावर परीणाम होतो. तो वाचविण्यासाठी रिक्षा संघटनांनी ऑनलाइन ई सेवा केंद्र सुरु केल्याने ते कौतुकास पात्र असल्याचे' मत कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कल्याण मधील एका कार्यक्रमात मांडले. 

राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील कामकाज सध्या ऑनलाईन सुरू झाले असून त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचू लागला आहे. दरम्यान रिक्षा चालकांनाही आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. मात्र गर्दीमुळे व्यावसायावर परीणाम होत होता. त्यामुळे अनेकजण आरटीओ कार्यालयमध्ये जाणे टाळत असे. त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईत त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी कल्याणमधील रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी पुढाकार घेत कल्याण पश्चिम मधील युनियनच्या कार्यालयमध्ये ऑनलाइन ई सेवा केंद्र सुरू केले असून त्याचे उद्घाटन शुक्रवार ता. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश पेणकर, माजी नगरसेवक रवि पाटील, आरटीओचे आय एच मासुमदार, वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, रेल्वे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरीक रिक्षा चालक आणि महिला रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी आपल्या भाषणात आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी वाढीव भाडे न घेण्याचे आवाहन केले. वाहतूक कोंडीत हॉर्न न वाजविता वाहन चालविण्यास सल्ला देत ते पुढे म्हणाले की, सरकारी सर्व कार्यालय ऑनलाईन होत आहे. तर कॅशलेस व्यवहार व्हावा यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्यामुळे नागरीकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. त्या धर्तीवर रिक्षा संघटनाने पुढाकार घेत ऑनलाईन ई सेवा केंद्र सुरू केल्याने सर्व सामान्य रिक्षा चालकाला आपल्या सोयीनुसार आरटीओ मधील काम करता येईल. त्यामुळे रिक्षा संघटना कौतुकास पात्र असल्याचे मत यावेळी ससाणे यांनी व्यक्त केले. रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना तर्फे ऑनलाईन ई सेवा केंद्राच्या उद्घाटन कल्याण आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com