आरटीआय कार्यकर्ते रडारवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

ठाणे - माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवतात आणि त्याच माहितीच्या आधारे न्यायालयात दुसरात याचिका करतो. काही वेळेस केस मागे घेतली जाते. काही जण एकाच विभागात एकाच विषयासाठी वारंवार अर्ज करत असल्याचेही आढल्यानंतर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची भूमिका संशयास्पद, ब्लॅकमेलिंगची वाटत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. त्यानुसार चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालिकेने ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. 

विधानसभेत झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या लक्षवेधीनुसार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेतही हा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. आरटीआय कार्यकर्त्यांचे पालिकेत काही अधिकारी जास्त मनोरंजन करतात; त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते; तर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कितपत माहिती द्यावी, कोणती माहिती देऊ नये, एक कार्यकर्ता किती वेळा माहिती मागतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते. 

विधानसभेत झालेल्या चर्चेनुसार आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेतही यातील काही बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या. प्रशासनातर्फे गेला महिनाभर अशा आरटीआय कार्यकर्त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यातून काही महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काही व्यक्ती एकाच विभागात सुमारे ६० हून अधिक अर्ज टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशांच्या बाबतीत शंका उपस्थित होत आहेत. आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यास माझा विरोध नसल्याचेही आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले; परंतु अशा पद्धतीने एकाच विभागात अर्ज करून त्रास देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर पोलिसांशी सल्लामसलत करून, कायदेशीर बाबींचा तपास करून नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.

साखळी कार्यरत असल्याचा संशय
वारंवार तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये सुधीर बर्गे, राजकुमार यादव, संजय घाडीगावकर, आनंद पारगावकर, राजेश मोरे, इराकी आरीफ, रामभाऊ तायडे, प्रदीप पाटील, शौकत मुलानी, मुकेश कनकिया आदींचा समावेश असल्याचा उल्लेख पालिकेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे. या व्यक्तींचा हेतू स्पष्टपणे संशयास्पद आणि ब्लॅकमेलिंगच्या स्वरूपात असल्याचा निष्कर्षही पालिकेने काढला आहे. या व्यक्तींच्या या अनियमित कृतीबाबत सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून तयार करण्यात आली असून, त्यानुसार व्यक्तीनिहाय व कामनिहाय सविस्तर माहिती तयार करण्यात आली असून ती या पत्राबरोबर पालिकेने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात यापैकी काही व्यक्तींची एक साखळी कार्यरत असल्याचा निष्कर्षदेखील पालिकेने काढला आहे. या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालिकेने पोलिसांना केली आहे.

Web Title: marathi news RTI Activists thane  TMC