माहिती विचारणे गुन्हा आहे का?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

महापालिका प्रशासनाला वाटते, म्हणून आम्ही माहिती मागायची नाही का, असा प्रश्‍न या यादीमधील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.आम्ही महापालिकेतील चुकीची कामे उघडकीस आणल्यामुळेच आम्हाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच महापालिकेतील कामांच्या चुका दाखवल्यानंतर, जर अशी कारवाई होत असेल, तर पुन्हा असे प्रश्‍न विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापालिकेकडून अथवा पोलिसांकडून आपल्याला याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही; परंतु माहिती अधिकारात माहिती विचारणे चुकीचे आहे का? माहिती मागविणे हा नागरिक म्हणून हक्क आहे.
- सुधीर बर्गे, माहिती अधिकार कार्यकर्ते

मी २०१४ मध्ये एक फाईल गहाळ झाल्याने एकच आरटीआय टाकला होता. त्यानंतर आजतागायत मी एकही अर्ज केलेला नाही; परंतु संविधानाने दिलेल्या अधिकाराची अशा पद्धतीने गळचेपी होत असेल, तर आणखी पत्रव्यवहार केले जातील. वेळ पडल्यास पालिकेच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू. माहिती अधिकारावर अशी बंधने आणणे चुकीचे आहे.
- रामभाऊ तायडे, माजी नगरसेवक, महापालिका, ठाणे 

पालिकेच्या काही विभागात सुरु असलेली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.  आमच्याकडून ब्लॅकमेलिंग झाले असेल, तर तशी तक्रार करणे योग्य आहे; हा सूड उगवण्याचा  प्रयत्न आहे. 
- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य, पालिका

पालिकेकडून या संदर्भात अद्याप लेखी स्वरूपात आम्हाला कोणतीच माहिती मिळालेली नाही. त्यामुळे यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही; परंतु वेळ पडल्यास वकिलांशी चर्चा करून कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करण्याची आम्हाला गरजच नाही.
- संजय घाडीगावकर, माजी नगरसेवक

Web Title: marathi news RTI thane