सफाळे येथील बेकायदेशीर पार्किंगला लगाम 

प्रमोद पाटील 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सफाळे : सफाळे रेल्वेस्टेशनच्या पूर्वेकडे असलेली पार्किंग व्यवस्था सुरळीत होण्याकरिता दैनिक सकाळच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सुरु असताना दैनिक सकाळ च्या वृत्ताची दखल घेऊन बुधवारी (ता. 7) रेल्वेप्रशासन खडबडून जागे जागे झाले आणि बेशिस्त वाहनचालकांना कारवाई करण्यात आल्याने त्यांना मोठी चपराक बसली आहे. बेशिस्त पार्किंगच्या विळख्यातून नागरिकांची सुटका झाली आहे.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सकाळी गर्दीच्या वेळी काही बेशिस्त वाहन चालक गाडी पकडण्याची घाई करतात व कुठेही अन् कशीही गाडी ठेवून जातात. ह्याचा त्रास दिवसभर सामान्य नागरिकांना होत असतो. ऐन गर्दीच्या वेळी मुंगीच्या गतीने मार्ग काढत प्रवाश्यांना जावे लागते. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अनेकदा 'नो पार्किंग'चे बोर्ड लावून सूचना केल्या आहेत; परंतु पुन्हा आठ दिवसांत या सुचनेकडे दुर्लक्ष करून काही मुजोर प्रवासी अव्यवस्थितपणे गाड्या लावून जात होते. सफाळे रेल्वे मास्टर यांनी दिलेल्या सुचनेनुसार मंगळवारी  रात्री  एकच्या सुमारास उशीरा मुख्य मार्गावर कंपाउंड घालून मार्ग सुरक्षित करण्यात आला आहे. प्रवाश्यांनी रेल्वेची कंत्राटी पार्किंग व्यवस्था वापरून सहकार्य करावे,असे आवाहन रेल्वे मास्टर चुनिलाल अगिवाल यांनी केले आहे. 

Web Title: Marathi news safale news no parking