डोंबिवलीत अंतराळ विज्ञान प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन 

Marathi news space exhibition and seminar in dombivali
Marathi news space exhibition and seminar in dombivali

डोंबिवली - डोंबिवलीच्या वैभवशाली शैक्षणिक परंपरेत मोलाची भर घालणारे भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन प्रथमच 30 व 31 जानेवारी रोजी रिजन्सी निर्माण कल्याण रोडा येथे आयोजित करण्यात आले आहे. भारताची अंतराळ संस्था इस्रोने शंभर सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण करीत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला. या अभिमानास्पद क्षणांचा मागोवा घेत डोंबिवलीमध्ये मंगळवार (ता. 30) जानेवारीला भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील असे भरविले जाणारे पहिलेच भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन आहे. 

या विज्ञान प्रदर्शनाला कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील शाळांमधील सुमारे वीस हजार विद्यार्थी व पालक उपस्थित राहणार असून जगातील सर्वात मोठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्याचा विश्वविक्रम करत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. नासा, डावखर इंफास्टरक्चर प्रा. ली., समर्थ पेट्रोलियम, स्पेस नॉट, रिजन्सी निर्माण ली, जागतिक विश्वविक्रम नोंद ठेवणारी संस्था या सर्व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली परिसरातील पहिले भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. डोंबिवली पुर्वेकडील कल्याण शीळ रोड विको नाका गोळवली येथील रिजेन्सी निर्माण परिसरातल्या भव्य मैदानात सकाळी दहा ते सायंकाळी आठ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अंतराळ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अंतराळ व खगोल शास्त्रामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही विशेष अंतराळ विज्ञान प्रदर्शनचे आयोजन करीत आहोत. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे अशी माहिती प्रमुख आयोजक संतोष डावखर यांनी दिली. सुमारे 20 हजार हुन अधिक विद्यार्थी पालकवर्ग या प्रदर्शनास भेट देतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अंतराळ विश्वाबद्दल तसेच अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दल इत्यंभूत माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नासा, रशिया, जपान, इ. ए. एस. ए. व इस्रोद्वारे निर्मित दुर्मिळ असे जागतिक उपग्रह आणि रॉकेट यांच्या प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. शंभराव्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणचे औचित्य साधून एक दिवस विशेष इस्रो गॅलरी सदर प्रदर्शनात तयार करण्यात येणार आहे. सदर प्रदर्शनात खगोलशास्त्रज्ञांचे विशेष संवाद शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अंतराळ विश्वावद्दल 20 मिनिटांचा विषेश माहितीपट देखील पहावयास मिळणार आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सिम्युलेशन प्रोग्रामाद्वारे उपग्रहांचे थेट ट्रेकिंग वापरुन रियलटाईम प्लेनेटरी पोझिशन पहावयास मिळतील. यामध्ये काही शाळांच्या पण संबंधित प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनातील टेलिस्कोपबद्दल जवळून माहिती देऊन ते हाताळण्याचे तंत्र शिकवले जाणार आहे. आयोजकांनी या कार्यक्रमाच्या आधारे आम्ही जगातील सर्वात मोठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करत असून त्याची नोंदणी व सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड सेंटर ही संस्था करणार असल्याचे सांगितले. सदर प्रदर्शन नासा या अमेरिकन एजन्सीसोबत भागीदारी करुन प्रदर्शित करणार असून प्रदर्शन नासाच्या अधिकृत संकेस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. सर्वसामान्यांनी विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यापूर्वी काही वर्ष सातत्याने संतोष डावखर व त्यांचे सहकारी सर्प प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन शा विविध विद्यार्थी उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत असून दरवर्षी दहा ते पंधरा हजार विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com