उद्यापासून ‘एसपीएल’चा थरार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नवी मुंबई - उदयोन्मुख क्रिकेट संघांना व्यासपीठ मिळण्याच्या हेतूने ‘सकाळ माध्यम समूह’ आणि रामदास शेवाळे सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सकाळ प्रीमियर लीग (एसपीएल) मीडिया चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार (ता. २३)पासून सुरुवात होणार आहे. बेलापूर सीबीडीमधील ‘सकाळ भवन’च्या प्रांगणात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘एसपीएल’मध्ये खेळणाऱ्या संघांची नावे आणि स्पर्धेची नियमावली जाहीर करण्यात आली. या वेळी सामन्यांचे ड्रॉही काढण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंना टी-शर्टचेही वाटप करण्यात आले.

कळंबोलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘एसपीएल’ स्पर्धा रंगणार आहे. ग्रामीण, शहरी आणि खुला अशा तीन गटांमध्ये स्पर्धा होईल. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (ता. २५) होईल. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘साम टीव्ही’ आणि सोशल मीडियावर होणार आहे. सामन्यांचे ड्रॉ काढण्यासाठी ‘सकाळ भवन’च्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास सर्व संघांचे प्रमुख आणि क्रिकेटपटू सहभागी झाले होते. 

‘सकाळ’चे (मुंबई) संपादक राहुल गडपाले, ‘साम टीव्ही’चे संपादक नीलेश खरे, मार्केटिंग हेड भूषण खोत, शेवाळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास शेवाळे आदीही उपस्थित होते.

उत्सुकता शिगेला
‘एसपीएल’ स्पर्धेत नवोदित क्रिकेटपटूंबरोबरच देश-विदेशात उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडूही सहभागी होणार आहेत. साहजिकच स्पर्धेतील सामने चुरशीचे होणार असल्याने त्याचा थरार पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: marathi news SPL mumbai sakal cricket