सिंचन गैरव्यवहाराशी संबंधित बिल्डरची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई - मुंबईतील बांधकाम व्यावसायिक जिगर ठक्कर (41) यांनी मंगळवारी मरिन ड्राइव्ह परिसरात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. नागपूरमधील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पांतर्गत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा मातीकाम व बांधकामातील गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठक्कर यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. 

घाटकोपर येथील रहिवासी असलेले ठक्कर सायंकाळी 7च्या सुमारास मरिन ड्राइव्ह परिसरात आले होते. मरिन प्लाझा येथे आल्यावर गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून थोड्या अंतरावर थांबण्याची सूचना त्यांनी चालक सुनील सिंग याला केली. सिंग कारपासून दूर अंतरावर गेल्यावर ठक्कर यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्‍यात गोळी झाडली. ही बाब लक्षात येताच सिंग याने पोलिसांच्या मदतीने ठक्कर यांना जीटी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्‍टरांनी ठक्कर यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (परिमंडल-1) मनोजकुमार शर्मा यांनी दिली. ठक्कर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कारचालक सिंग याच्याकडून अधिक माहिती घेत आहेत. 

Web Title: marathi news suicide mumbai irrigation