आणखी दोन दिवस काहिली? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई -  मुंबई परिसरात मंगळवारी 37.8 अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस तापमानचा पारा चढाच असेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत आहे. मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. चार दिवसांपासून लिंबू-सरबत, थंडगार पेये, आईस्क्रीमची मागणी वाढल्याचे चित्र आहे. नागरिक डोक्‍यावर शाल, टोपी घालून प्रवास करणे पसंत करत आहेत. 

मुंबई परिसरात मंगळवारी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस होते. बुधवारी किमान तापमान 21; तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Web Title: marathi news temperature mumbai