कॅशलेशसाठी जनजागृती रॅली

नंदकिशोर मलबारी
रविवार, 24 डिसेंबर 2017

सरगांव - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई येथे विद्यार्थ्यांची कॅशलेशसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. नोटबंदीनंतर सर्वत्र चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील पहिले कॅशलेश गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई गावाचे कौतुक झाले. धसई येथे येऊन पातकर यांच्या किराणा दुकानात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुरबाडची शान असलेला झीनी जातीचे तांदूळ खरेदी करून कॅशलेशचा शुभारंभ केला होता. मात्र यानंतर म्हणावा तेवढा प्रतिसाद या कॅशलेसला न मिळता पुन्हा रोखीने व्यवहार सुरु झाले. 

पुन्हा एकदा या परिसरातील जनतेत कॅशलेशची जनजागृती व्हावी म्हणून मुरबाड तहसीलदार सचिन चौधर यांच्या पुढाकाराने धसई येथील शाळांची मदत घेऊन शाळकरी मुलांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली. धसई गावात कॅशलेशचे महत्व जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे या महाराष्ट्र शासनाच्या या महत्वकांक्षी उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी मुरबाड महसूल कार्यालयाच्या पुढाकाराने धसई बाजारपेठेत महात्मा गांधी विद्यालय व जनता विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वर्गाला सहभागी करून ही रॅली काढण्यात आली. यावेळी डिजिटल क्रांती देशाची क्रांती, डिजिटल व्यवहार चोख व्यवहार अशा प्रकारच्या घोषणा देत रॅली काढली. या रॅलीत धसई सजेचे तलाठी संतोष पवार, महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक मुकुंद गायकवाड, नरेश पडवळ, तसेच जनता विद्यालयातील लियाकत शेख व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.           

Web Title: Marathi News Thane News Cashless Awareness Rally