अन् त्याने चुलत भावाची बायकोच नेली पळवून

नंदकिशोर मलबारी
शनिवार, 20 जानेवारी 2018

या घटनेची कल्पना दिपालीच्या नवऱ्याला येताच त्यांने आपली पत्नी दिपाली हरवण्याची तक्रार भानुदास याने मुरबाड ठाण्यात दाखल केली. याच दरम्यान धिरजही गायब झाल्याने धिरजचा भाऊ भरत यांनाही धीरज गावातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तोपर्यंत गावात व परिसरात या प्रेमाची चर्चा चांगलीच होऊ लागली.

ठाणे : मुरबाड तालुक्यातील माझंगाव येथील एका इसमाने आपल्या चुलत भावाची बायको पळवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेबद्दल मिळालेली माहीती अशी, की तालुक्यातील माझंगाव येथील भानुदास पांडूरंग पष्टे याचे गावाशेजारी असलेल्या पारतळे येथील दिपाली (22) या तरूणीवर प्रेम होते. या प्रेमाचे रूपांतर प्रेमविवाह झाले. मात्र हे प्रेमविवाह जास्त दिवस चालला नाही. जेमतेम एक वर्षाच्या आत या दोघांमधे तू तू- मै मै होऊ लागल्याने दिपालीचे तिच्या नवऱ्याच्या चुलत भाऊ धीरज जानू पुष्पे (22) याच्यावर प्रेमसंबंध जुळले. नवऱ्याच्या नकळत हे दोघे भेटू लागले. असे किती दिवस भेटायचे असे मनात आल्याने दिपाली नवऱ्याला सोडून धीरज बरोबर पळून गेली.

या घटनेची कल्पना दिपालीच्या नवऱ्याला येताच त्यांने आपली पत्नी दिपाली हरवण्याची तक्रार भानुदास याने मुरबाड ठाण्यात दाखल केली. याच दरम्यान धिरजही गायब झाल्याने धिरजचा भाऊ भरत यांनाही धीरज गावातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तोपर्यंत गावात व परिसरात या प्रेमाची चर्चा चांगलीच होऊ लागली. मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजय वसावे यांनी सखोल चौकशी करून पोलिस शिपाई खोमणे, खेडकर, व महिला पोलिस शिपाई पवार याच्या मार्फत तपास सूरू केला. हे दोघे नवी मुंबई येथील खारघर येथे असल्याची खबर मिळताच त्या ठिकाणी जाऊन या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुमाडा करीत आहेत.

Web Title: Marathi news Thane news crime in murbad