मुरबाड तालुक्यात प्रसादातून विषबाधा

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

मुरबाड : तालुक्यातील संगमेश्वर देवस्थानात एका युगुलाने प्रसाद म्हणून वाटलेल्या पेढ्यातून 32 जणांना विषबाधा झाल्याने 27 जणांना उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात तर 5 जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवार (ता. 21) सायंकाळी हा प्रकार घडला विषबाधा झालेल्या मध्ये 8 मुले, 18 मुली, 3 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यांच्या सीमेवर संगमेश्वर येथे शंकराचे पुरातन मंदीर असून ते नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे. काळू  नदी, डोईफोडी नदी या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झाल्याने या ठिकाणाला संगमेश्वर हे नाव पडले आहे.

मुरबाड : तालुक्यातील संगमेश्वर देवस्थानात एका युगुलाने प्रसाद म्हणून वाटलेल्या पेढ्यातून 32 जणांना विषबाधा झाल्याने 27 जणांना उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात तर 5 जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवार (ता. 21) सायंकाळी हा प्रकार घडला विषबाधा झालेल्या मध्ये 8 मुले, 18 मुली, 3 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यांच्या सीमेवर संगमेश्वर येथे शंकराचे पुरातन मंदीर असून ते नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे. काळू  नदी, डोईफोडी नदी या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झाल्याने या ठिकाणाला संगमेश्वर हे नाव पडले आहे. येथे दर्शनासाठी व दशक्रिया विधीसाठीही लोक येतात.

गुरूवारी (ता. 21) संध्याकाळी 7 च्या सुमारास 25-27 वयोगटातील तरुण आणि तरुणी नवस पूर्ण झाल्याने येथे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी प्रसादासाठी आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्स मधून पुजाऱ्याला अर्धा पेढा प्रसाद म्हणून दिला आणि उरलेले  पेढे त्यांनी या मंदिरापासून जवळच असणाऱ्या संगमवाडी या आदिवासी वस्तीत प्रसाद म्हणून वाटले व तेथून ते दोघे निघून गेले. त्यानंतर येथील नागरिकांना मळमळ आणि उलट्या चक्कर येऊ लागल्याने येथील इतर ग्रामस्थांनी त्यांना सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र तेथे पुरेशी सुविधा नसल्याने त्यांना मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार कळताच मुरबाड पोलिस ठाण्याचे पेालिस उपनिरीक्षक सुहास खरमाटे आणि मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर हे घटनास्थळी दाखल झाले. प्रसाद वाटणारे तरुण-तरुणी कोण आहेत  याचा तपास पोलीस करीत आहे.

 

Web Title: Marathi news thane news food poisoning