ठाणे स्थानकात साईडींगला उभ्या लोकलला आग

दीपक शेलार
बुधवार, 17 जानेवारी 2018

रेल्वेच्या डब्बा क्र. 2010 बी मोटर कोच या डब्यााला आग लागली होती. सदर आग नियंत्रणात आणली असून घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाची 4 फायर वाहने, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यु वाहन उपस्थित होते.

ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्र. 1 च्या साईडींगवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून आलेल्या 12 डब्यांच्या लोकलला आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर दिड वाजण्याच्या सुमारास घडली.

रेल्वेच्या डब्बा क्र. 2010 बी मोटर कोच या डब्यााला आग लागली होती. सदर आग नियंत्रणात आणली असून घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाची 4 फायर वाहने, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यु वाहन उपस्थित होते.

या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणामध्ये असुन सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.अशी माहीती रेल्वे सुत्रांनी दिली.

Web Title: Marathi news Thane news local train fire