लग्नसराईला प्रारंभ; यंदा 52 शुभमुहूर्त

दीपक शेलार
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

2018 मधील लग्नाचे मुहूर्त  
फेब्रुवारी – 5, 9, 11, 18,19, 20, 21, 24
मार्च- 3, 4, 5, 6, 12, 13,14
एप्रिल- 19, 20, 24, 25, 26, 27, 28,30
मे- 1,2,4,6,7,8,9,11,12
जून – 18,23,28,29
जुलै – 2,5,6,7,10,15
डिसेंबर – 2, 13,17,18,22,26,28,29,30,31

ठाणे : यंदा ज्यांचा लग्नाचा प्लॅन आहे,त्यांनी आजपासून लग्नसराईच्या लगीनघाईला आरंभ करावा. कारण, यंदाच्या संपूर्ण वर्षात 52 शुभमुहूर्त असले तरी, चातुर्मास आणि अधिक मासामुळे तसेच, 15 जुलै ते 1 डिसेंबरपर्यंत तब्बल 5 महिने लग्नाचे मुहूर्तच नसल्याने विवाहेच्छुकाना आगामी वर्षाची वाट पहावी लागणार आहे.गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल 20 ते 25 मुहूर्त कमी आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुह्स्यातील महत्वाचा टप्पा आहे.ज्यांच्या-त्यांच्या धर्मानुसार,रूढीपरंपरेनुसार आप्तइष्ट नातलगांसह विधियुक्त विवाहसोहळे साजरे करण्याची पद्धत भारतीय संस्कृतीमध्ये रूढ आहे.यासाठी शुभमुहूर्त पाहिले जातात. यातही काही अपवाद आहेत, कोणत्याही मुहूर्ताची अटकळ न बांधता आपल्या सोईनुसार कोर्ट मेरेज अर्थात रजिस्ट्रेशन पद्धतीने विवाह करतात. परंतु, आजही शुभ मुहूर्तांला तितकेच महत्व असल्याचे दिसून येते. त्या नुसार, यंदा विवाह बंधनात अडकणाऱ्या विवाहेच्छुकांसाठी पौष महिन्यात अर्थात नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त नव्हता. मात्र,फेब्रुवारीच्या 5 तारीखपासून (आजपासून) शुभमुहूर्तांना प्रारंभ होत असल्याने यंदाच्या लग्नसराईची लगीनघाई सुरु झाली आहे. परंतु,मे महिन्यातील 12 तारखेच्या अखेरच्या विवाह मुहूर्तानंतर अधिक ज्येष्ठ मास सुरु होत असल्याने 17 जूनपर्यंत तब्बल 36 दिवस विवाहेच्छुकाना अंमळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, या कालावधीतही कुठलाही शुभमुहूर्त नाही.तर, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात बरेच मुहूर्त असले तरी वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात मात्र सर्वाधिक 10 दिवस शुभमुहूर्त असल्याचे सोमण यांनी सांगितले. तरीही,अनेक जण आपल्या वेळ-काळ आणि सोयीनुसार मुहूर्त काढून शुभकार्य उरकू शकतात.असेही ते म्हणाले.

शुभकार्यांचा हंगाम सुरु झाला कि व्यापार उदिमालाही सुगीचे दिवस येतात. प्रत्येकालाच आपल्या घरचे शुभकार्य डामडौलात करायचे असते.तेव्हा,विवाहासाठी लागणारे दागदागिने,कपडे-लत्ते तसेच,इतर जामानिमा ओघाने आलेच.त्यामुळे या कालावधीत बाजारात रेलचेल असते.मात्र,लग्नसमारंभासाठी अव्वाच्यासव्वा खर्चाची उधळण करण्यापेक्षा वर-वधू पक्षांनी भविष्याची निकड ओळखावी.असे आवाहनदेखील सोमण यांनी केले आहे.  

2018 मधील लग्नाचे मुहूर्त  
फेब्रुवारी – 5, 9, 11, 18,19, 20, 21, 24
मार्च- 3, 4, 5, 6, 12, 13,14
एप्रिल- 19, 20, 24, 25, 26, 27, 28,30
मे- 1,2,4,6,7,8,9,11,12
जून – 18,23,28,29
जुलै – 2,5,6,7,10,15
डिसेंबर – 2, 13,17,18,22,26,28,29,30,31

Web Title: Marathi news Thane news Marriage dates this year

टॅग्स